
सोलापूर, 20 जानेवारी, (हिं.स.) - प्रेम, सेवा अन् एकत्वाच्या पावन भावनांनी ओतप्रोत असलेला महाराष्ट्रातील ५९ वा निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारीदरम्यान सांगली येथे होणार आहे. या भव्य आध्यात्मिक सोहळ्यासाठी सोलापूर शहर, जिल्ह्यातून सुमारे १० हजार भक्त उपस्थित राहणार आहेत. २२ जानेवारीपासूनच भक्तांचा जत्था सांगलीकडे रवाना होणार आहे.
सद्गुरु माताजींच्या दिव्य सान्निध्यात सांगली शहरालगतच्या सांगलवाडी परिसरातील ४०० एकरांच्या विस्तीर्ण मैदानावर हा सोहळा परमपूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य सान्निध्यात पार पडणार आहे. गेल्या महिनाभरापासून सोलापूरच्या निष्काम सेवा दलासह राज्यातील हजारो अनुयायी या ठिकाणी नगरी सुसज्ज करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
‘आत्म-मंथन’ संकल्पनेतून आत्मबोध यंदाच्या समागमासाठी ‘आत्म-मंथन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. आत्मबोध, आत्मशुद्धी आणि मानवी मूल्यांच्या जागृतीचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. दररोज दुपारी २:३० वाजता मुख्य सत्संग कार्यक्रमाला सुरवात होईल, ज्याचा समारोप रात्री ९ वाजता सद्गुरु माताजींच्या प्रेरणादायी आर्शिवर्चनांनी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड