सोलापूर जिल्हा परिषद गटासाठी 94 तर पंचायत समिती गणासाठी 113 अर्ज विक्री
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्यामध्ये जोरदार प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. 207 इतके नामनिर्देशन पत्र घेतले गेले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद व 8 पंचायती समितीच्या जागेवर होणाऱ्या निवडणुकीसाठी तालुक्यातून मोठा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोणत्याही पक्षाने अथवा कोणत्याही आघाडीने आपले पत्ते ओपन केले नसल्याने संभाव्य नावे चर्चेत आहेत. याबाबत अधिकृत दुजोरा कोणत्याही गटाने दिला नाही. मंगळवेढा तालुक्यामध्ये भालके परिचारक व आ. आवताडे यांची राजकीय ताकद मोठी आहे. या तीन गटातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक लढवणारे इच्छुक जास्त असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांना बैठका घेऊन पुढे कोणतीही दिशा सापडत नसल्याने सध्या त्यांनी आपले समर्थक भालके, परिचारक, आ. आवताडे यांच्या गटात निवडणुकीला उभे राहतील का? याबाबतची चाचपणी करत आहेत. सध्या चेअरमन शिवानंद पाटील यांनी दामाजी नगर जिल्हा परिषद गटासाठी लढावे, अशी त्या भागातील लोकांनी मागणी केली. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी द्यायची, या भूमिकेने निवडणूक लढवणार नाही. हा निर्णय घेतल्याचे दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

 rajesh pande