
छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)।
पंडित दीनदयाळ शिक्षण संस्था व शांती प्रतिष्ठान, किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण कृष्णराव फुलंब्रीकर संगीत त महोत्सवाचे उद्घाटन श्री संत सावता माळी संकुलात फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.
या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष देवजीभाई पटेल, संस्थेचे सचिव निवृत्ती गावंडे, संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे, प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले, श्रीकांत उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्य, 'हा महोत्सव आगामी काळात पूर्ण फुलंब्री तालुक्यासाठी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; तसेच येथील लोकांना संगीत, कला याची ओळख करून देऊन संस्कृती जोपसण्याचे काम या महोत्सवामधून केले जाईल.' या प्रसंगी परिसरातील विविध कलाकारांनी महाराष्ट्राच्या लोकधारेअंतर्गत भजन, लोकनाट्य,लावणी, गवळण यां कलाप्रकारांचे सादरीकरण करून विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
या प्रसंगी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, प्रियाताई फुलंब्रीकर, नितीन देशमुख, कार्याध्यक्ष योगेश मिसाळ, डॉ. गणेश कुलकर्णी, महोत्सव कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सर्व नगरसेवक, श्री संत सावता संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन रांजणीकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis