
छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)। इंद्रराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या आयोजित सात दिवसांच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा वरूड येथे मोठ्या उत्साहात झाला.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जी. जी. राजपूत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दीपक गवई उपस्थित होते.
विशेष उपस्थितीत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. लांब; तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सी. एम. काळे, उपस्थित होते.
शिबिराच्या समारोपाचे संचलन कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. एम. बिरादार यांनी केले. शिबिराच्या सात दिवसांच्या कामासंदर्भातील अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी डॉ. के. आर. नगरे यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विनोद शेळके यांनी मानले. शिबिरास इंद्रराज महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व वरूड गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis