नांदेड-मुखेड आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन
नांदेड, 20 जानेवारी (हिं.स.)राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे मुखेड आगारात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. भविष्यातील इंधनाचे धोके लक्षात घेता प्रत्येक वाहन चालकांनी तसेच अभिय
नांदेड-मुखेड आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन


नांदेड, 20 जानेवारी (हिं.स.)राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे मुखेड आगारात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

भविष्यातील इंधनाचे धोके लक्षात घेता प्रत्येक वाहन चालकांनी तसेच अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी यांनी इंधन बचत काळाची गरज ओळखून त्यांच्या जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी इंधन बचत मासिक अभियान राबविण्यात येते. त्या अनुषंगाने मुखेड आगारात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड येथील प्रा. सतीश खोचरे यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख सुभाष पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक निरीक्षक सुरज कुरुडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. खोचरे यांनी भविष्यात इंधनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. इंधन बचत करणारा चालक म्हणजे महामंडळाचा खरा नायक आहे. प्रत्येक चालकांनी इंधनाच्या एक- एक थेंब बचतीकडे लक्ष दिल्यास महामंडळाचा व परिणामी देशाचा मोठा फायदा होतो असे ते म्हणाले.

तसेच अचानक ब्रेक मारणे, ब्रेक वेग मर्यादा जास्त ठेवणे अशा काही कारणामुळे इंधनाची बचत होत असल्याची उजळणी करून दिली. यावेळी वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे, पाळी प्रमुख हणमंत डोणगावे,आगार लेखाकार धनंजय जाधव, वरिष्ठ लिपिक शिवप्रसाद बंडे, उपस्थित होते. सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक शिवप्रसाद बंडे यांनी केले तर गोपाळ पाटील यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande