
नाशिक, 20 जानेवारी (हिं.स.)।
ज्याच्यासाठी केला अट्टाहास त्याची अशी अवस्था असे सांगितले जाते. तसेच नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत महापौर तसेच अन्य पदांची स्वप्न बघणाऱ्या व त्यासाठी लाल दिवा आपल्याला मिळावा म्हणून केलेल्या अट्टाहासाची काय अवस्था असते याचे बोलके उदाहरण नाशिकमध्ये सुरू असलेल्या महापौर निवास दुरुस्तीच्या निमित्ताने समोर आले आहे.
नुकत्याच राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये अनेकांनी नगरसेवक होण्याची स्वप्न बघितली तर काहींनी आपल्याला महापौर पदाचा लाल दिवा मिळावा म्हणून स्वप्न बघितले परंतु ही स्वप्न बघत असताना काय काय त्रास सहन करावा लागला हे फक्त स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीलाच माहिती आहे पण नाशिक मध्ये स्वप्न बघणाऱ्यांना काय किंमत असते हे समोर येत आहे.
सध्या नाशिक मध्ये महापौर यांच्या निवासस्थान असलेले रामायण बंगल्याची दुरुस्ती चालू आहे या दुरुस्तीच्या निमित्याने बंगल्यामध्ये असलेली अडगळ कचरा सर्व बाहेर काढला जात आहे आणि रंगरंगोटी करून महापौरांना राहण्यासाठी बंगला सज्ज केला जात आहे परंतु महापौर होण्यासाठी आणि महापौरांचा लाल दिवा मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागल्या त्या लाल दिव्याची काय अवस्था आहे हे नाशिकमध्ये या रामायण मंगलाच्या दुरुस्तीच्या निमित्ताने समोर आले आहे हा लाल दिवा अडगळीस पडला आहे त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही अशा लाल दिव्याला काय किंमत ही फक्त वापरणाऱ्याला समजते हे मात्र तेवढे खरे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV