
पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि ‘वन्दे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘वन्दे मातरम्’चे अभ्यास मिलिंद प्रभाकर सबनीस यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार असून ‘वन्दे मातरम्’ या मराठी पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे.
स्वानंद फाऊंडेशन आणि संवाद पुणे आयोजित कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहे. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या निमित्ताने ‘माँ तुझे सलाम’ हा देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची संकल्पना स्वानंद फाऊंडेशनचे संजीव शहा यांची असून निर्मिती संवाद पुणेचे सुनील महाजन यांची आहे. कार्यक्रमाच्या सूत्रधार निकिता मोघे असून संयोजन केतकी महाजन-बोरकर करीत आहेत. जितेंद्र भुरुक, अश्र्विनी कुरपे, कविता जावळेकर, आकाश सोलंकी, बबलू खेडकर देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत. सोमनाथ फोटके, रोहित साने, रशिद शेख, अमन सय्यद साथसंगत करणार असून निवेदन योगेश सुपेकर यांचे आहे, अशी माहिती स्वानंद फाऊंडेशनचे संजीव शहा, साधना शहा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु