
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आखाड्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.तीन वर्षांपूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व गटातील संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले तीन वर्षे कारखान्याचा कामकाज करताना कामगाराचा थकीत पगार ,भविष्य निर्वाह निधीची रक्कम व इतर थकीत देणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.या गटात लिंगायत ,धनगर,मराठा व इतर समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत.ऊस उत्पादक पट्टा असल्यामुळे सहाजिकच दामाजी कारखान्याबद्दल या परिसरात मोठी विश्वासार्हता ती अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी टिकवून ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली या गटावर वर्चस्व प्रस्थापित करणे सहज शक्य होणार होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड