
मुंबई, 20 जानेवारी, (हिं.स.)। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबई, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (डीएआयसी) यांनी वर्ल्ड इंटलेक्चुअल फाउंडेशनशी सहकार्याची घोषणा करत भारताचा पहिला रिस्पॉन्सिबल नेशंस इंडेक्स (RNI) लाँच केलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा लाँच झाला. जागतिक स्तरावर आधारित हा निर्देशांक पारंपारिक जीडीपी-आधारित मेझर्सच्या पलीकडे जातो.
या घोषणेने उत्तरदायित्व, दीर्घकालीन वचनबद्धता आणि नैतिक प्रशासनावर वाढत्या भरला अधोरेखित केले, जे आजच्या वाढत्या गुंतागुंतीच्या जागतिक वातावरणात अत्यावश्यक आहेत. या घोषणेने पर्यावरणीय जबाबदारी आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
पारंपरिक आर्थिक निर्देशकांपलीकडील यशाच्या आधारावर १५४ देशांचे मूल्यांकन केले जात असल्याने, हा निर्देशांक एक पारदर्शक आणि सर्वसमावेशक मूल्यांकन आराखडा देतो. या पुरोगामी दृष्टिकोनातून, माहितीपूर्ण धोरण-निर्मिती, विधायक आंतरराष्ट्रीय संवाद आणि जीवनमानाची सुधारलेली गुणवत्ता यांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते.
या प्रसंगी भारताचे माननीय माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद, ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या शब्दांनी या सोहळ्याची शोभा वाढवली, त्यांनी पुढे नमूद केले की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, हा इंडेक्स एक अनुभव आणि विचार आहे. याद्वारे आपण राष्ट्रे आपल्या नागरिकांशी आणि मानवतेशी प्रत्यक्षात कसे वागत आहेत, याची गणना करू शकतो. खरं तर नैतिकतेची कल्पना भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून रुजलेली आहे.”
यावर भाष्य करताना, आयआयएम मुंबईचे डायरेक्टर प्रा. मनोज तिवारी म्हणाले, “आम्ही शैक्षणिक संस्कृतीच्या पलीकडे ज्ञान वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत. उदात्ततेकडे नेणाऱ्या मूल्यांची पुष्टी करणे ही एक संस्था म्हणून आमची जबाबदारी आहे. आपण सर्वजण केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून सामाजिकदृष्ट्या जबाबदार आहोत की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे.”
जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनीही निरीक्षण नोंदवले की, “अनिश्चिततेच्या जगात, वैधतेची शक्ती केवळ सत्तेतून नव्हे, तर जबाबदारीतून येते.”
तीन डायमेंशंसवर आधारित, हा एनआरआय, सन्मान आणि नागरिकांच्या कल्याणावर केंद्रित अंतर्गत जबाबदारी, शाश्वतता आणि हवामान कृतीवर केंद्रित पर्यावरणीय जबाबदारी आणि शांतता व जागतिक सहकार्यातील योगदानाचे मोजमाप करणारी बाह्य जबाबदारी यांना प्रोत्साहन देतो. जेव्हा सुधारणांची गरज आहे, अशा काळात या इंडेक्सची मानवकेंद्रित दृष्टी आशादायक आहे.
आयआयएम मुंबई बद्दल:
आयआयएम मुंबई (पूर्वी नीटी) ही १९६३ मध्ये स्थापन झालेली एक प्रसिद्ध व्यवस्थापन संस्था आहे. भारताच्या २०२४ च्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये ६ व्या क्रमांकावर असलेली ही संस्था ऑपरेशन्स, सप्लाय चेन, सस्टेनेबिलिटी आणि जनरल मॅनेजमेंटमध्ये उत्कृष्ट आहे. मुंबईत स्थित, ही संस्था उद्योग संवाद आणि सहकार्यासाठी आर्थिक राजधानीशी असलेल्या जवळीकतेचा फायदा घेते. एमआयटी आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट सारख्या शीर्ष जागतिक संस्थांमधील प्राध्यापकांसह, आयआयएम मुंबई एक चैतन्यशील बौद्धिक वातावरण देते. संस्थेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि एक नयनरम्य कॅम्पस आहे. पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत क्षमता बांधणीसाठी एक नोडल हब म्हणून, ते लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे आयोजन करते. आयआयएम मुंबई आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाणघेवाण भागीदारी आणि अत्याधुनिक संशोधनासह अध्यापनशास्त्र आणि परिणामांमध्ये नवोन्मेष आणते, ज्यामुळे लीडर्स आणि भारताच्या व्यवस्थापन परिसंस्थेला आकार मिळतो. संस्थाचे मजबूत उद्योग संबंध आणि संशोधन केंद्रीकरण हे व्यवस्थापन शिक्षणात आघाडीचे स्थान बनवतं.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर