मोरेश्वरबुवा चऱ्होलीकर यांच्या हस्ते मोतीबागेत होणार ध्वजवंदन
पुणे, 20 जानेवारी, (हिं.स.)। भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने मोतीबागेत प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सोमवारी २६ जानेवारीला सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी घोषवाद
मोरेश्वरबुवा चऱ्होलीकर यांच्या हस्ते मोतीबागेत होणार ध्वजवंदन


पुणे, 20 जानेवारी, (हिं.स.)। भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने मोतीबागेत प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सोमवारी २६ जानेवारीला सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी घोषवादनाने ध्वजाला अभिवादन करण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव यांनी दिली.

नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande