प्रजासत्ताकदिनी 8 लाख विद्यार्थ्यांची एकसारखी कवायत!
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। प्रजासत्ताकदिनी यंदा प्रथमच राज्यभर नवा प्रयोग केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना देशभक्तिपर गाण्यांचा व्हिडिओ पाठविला आहे. २६ जानेवारीला ध्वजवंदन झाल्यावर शाळांच्या वेळांनुसार पहिली ते बारावीच्य
प्रजासत्ताकदिनी 8 लाख विद्यार्थ्यांची एकसारखी कवायत!


सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। प्रजासत्ताकदिनी यंदा प्रथमच राज्यभर नवा प्रयोग केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना देशभक्तिपर गाण्यांचा व्हिडिओ पाठविला आहे. २६ जानेवारीला ध्वजवंदन झाल्यावर शाळांच्या वेळांनुसार पहिली ते बारावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी एकसारखी कवायत करतील. त्याचे व्हिडिओ, फोटो सर्व शाळांना शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत.सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५, माध्यमिक शिक्षण विभागाच्या एक हजार ८५ शाळा आहेत. याशिवाय खासगी शाळांची संख्याही एक हजारांवर आहे. या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या आठ लाखांपर्यंत आहे. या सर्व विद्यार्थ्यांची सध्या शाळांमध्ये कवायतीची तयारी सुरू आहे. दरवर्षी प्रजासत्ताकदिनी प्रत्येक शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने कवायती, भाषणे होत होती.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून वेबसाइट तयार केली जाणार आहे. त्याची लिंक सर्व शाळांना दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव, विद्यार्थ्यांच्या पालकांसह उपस्थित राहावे, अशाही सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande