साेलापूर महापालिका निवडणूक निकालाचे राजपत्र प्रसिद्ध
महापौर, उपमहापौर निवडीला येणार वेग सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या निकालांचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे १०२ प्रभागांतील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या निवडीला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
SMC Commisnar


महापौर, उपमहापौर निवडीला येणार वेग सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या निकालांचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे १०२ प्रभागांतील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या निवडीला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. नव्या महापालिका स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणीचे सोमवारी (ता. १९) प्राधिकृत प्रकाशन करण्यात आले आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी या निवडणूक निकालाचे प्रकटन केले आहे. ता. १५ रोजी घेण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या २६ प्रभागांच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या एकूण १०२ सदस्यांची नावे, प्रभागाचे ठिकाण व पक्ष महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ मधील अनुसूची ड, प्रकरण १ मधील (निवडणूक नियम) ३९ (२) नुसार प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande