अमरावती : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची ईव्हीएम गोदाम ची पाहणी
अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.) : सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त
सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची ईव्हीएम गोदाम ची पाहणी


अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.) : सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती येथील सांस्कृतिक भवनाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र साठवणूक व व्यवस्थापन केंद्राची सखोल पाहणी केली.

या ठिकाणी ईव्हीएम मशीन साठवून ठेवण्यात येत आहे. या ठिकाणी एफएलसी प्रक्रिया सुरु आहे. प्रथम स्तरीय तपासणी (एफएलसी) निवडणूकीपूर्वी प्रत्येक मशीनची तांत्रिक तपासणी केली जात आहे. या पाहणीदरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या सुरक्षित साठवणुकीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, सीसीटीव्ही निगराणी व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी तैनाती, अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच प्रवेश व निर्गमन नियंत्रण प्रणाली यांची सविस्तर माहिती आयुक्तांनी घेतली. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत संवेदनशील असल्याने कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ईव्हीएम गोदाम ची नियमित तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे २४ तास कार्यरत निरीक्षण, नोंदवही अद्ययावत ठेवणे तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यावर आयुक्तांनी विशेष भर दिला. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, त्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाहणीदरम्यान निवडणूक शाखेचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना आढळलेल्या किरकोळ बाबी तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी निवडणुका आदर्श आचारसंहितेचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande