
मुंबई, ३ जानेवारी (हिं.स.) : अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार डॉ अशोकराव मोडक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. वैचारिक मंथन आणि शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच होते. भारतीय तत्त्वज्ञान, एकात्म मानवदर्शन आणि वीर सावरकर इत्यादींवर विपुल लेखन त्यांनी केले. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. रशिया आणि भारत संबंध हा सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. छत्तीसगड केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. मोडक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी