
परभणी, 03 जानेवारी (हिं.स.)।
आयकर विभाग आणि
जीएसटी विभागाच्या वतीने फेक कंपनीच्या संदर्भात नागपूर येथे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर मधील सदर
बाजार पोलीस ठाण्याचे पथक गंगाखेडमध्ये चौकशीला आले आहे.
नागपूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्याचे एक अधिकारी आणि तीन कर्मचारी येथे दाखल झाले होते. एका फेक कंपनीच्या संदर्भात इन्कम
टॅक्स आणि जीएसटी विभागाकडे तक्रार गेली होती. त्यात येथील ३ जणांची चौकशी केली. ही प्रक्रिया सुरू होती, अशी प्राथमिक माहिती गंगाखेडचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis