
ठाणे, 03 जानेवारी (हिं.स.)। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभागसमिती मधून माघार घेतलेल्या उमेदवाराअंती एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 9 प्रभागसमितीमधून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाली होती . 1 व 2 जानेवारी रोजी मिळून एकूण 269 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शनिवार दि. 3 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर