ठाण्यात मनसेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती बांधुन निषेध
ठाणे, 03 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनितीने अर्ज बाद केले. नंतर, पैशांचा खेळ करून शिवसेना शिंदे गटाने ७ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. हे कृत्य लोकशाही विरोधी असु
Thane


ठाणे, 03 जानेवारी (हिं.स.)।

ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनितीने अर्ज बाद केले. नंतर, पैशांचा खेळ करून शिवसेना शिंदे गटाने ७ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. हे कृत्य लोकशाही विरोधी असुन मतदारांची घोर फसवणुक आहे. असा आरोप करीत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनसेने काळ्या फिती लावुन निषेध केला. यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी निवडणुक यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप महायुतीने १८ उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे मोठे आश्चर्य असुन याबद्दल ठाणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, बिनविरोध निवडून आलेल्या ७ पैकी ४ उमेदवार हे शिंदे गटाच्या निकटवर्तियांपैकी असुन येथील निवडणुक निर्णय अधिकारी वादग्रस्त वृषाली पाटील ह्या आहेत. या महिला अधिकाऱ्याची पोलखोल मनसेने एक दिवस आधीच केली होती. त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची घोर फसवणूक असुन सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचे दिसत आहे. असा आरोप मनसेने केला आहे. या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कामच केलेलं नाही, त्यामुळे ते *ठाकरे ब्रॅण्ड* समोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत. बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही, तर पैशांचा खेळ आहे. पैशाने निवडणूक जिंकणारे एक दिवस जनतेलाही विकायला काढतील. अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande