नांदेडमध्ये रिपाइं (आठवले)-भाजपा युती संपुष्टात
नांदेड, 03 जानेवारी (हिं.स.)। मनपा निवडणुकीतील जागावाटपात भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने भाजपशी असलेली युती संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. मनपा निवडणुकीसाठी भाजप व रिपाइं
नांदेडमध्ये रिपाइं (आठवले)-भाजपा युती संपुष्टात


नांदेड, 03 जानेवारी (हिं.स.)। मनपा निवडणुकीतील जागावाटपात भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने भाजपशी असलेली युती संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. मनपा निवडणुकीसाठी भाजप व रिपाइं (आठवले) यांची अधिकृत युती असतानाही रिपब्लिकन पक्षाने संयमाची भूमिका घेत समन्वयातून चर्चा केल्याचे नेत्यांनी सांगितले.

रिपाइं (आठवले) चे महाराष्ट्र राज्य संघटक विजय सोनवने, मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर, नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्ष गौतम काळे, नांदेड (उत्तर) जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर आणि महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून सहा जागांची मागणी केली होती. प्रभाग क्रमांक १ (अ) तरोडा खुर्द, ४ (अ) हनुमान गड, ७ (अ) जयभीमनगर, ८ (अ) शिवाजीनगर, १४ (अ) इतवारा आणि १९ (अ) वसरणी सिडको या जागांवर रिपाईने दावा केला होता. चर्चेनंतर प्रभाग १४ (अ) इतवारा आणि प्रभाग २० (अ) सिडको-वाघाळा या दोन जागा देण्याचे निश्चित झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी भाजपने भूमिका बदलत रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म न देता त्या जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर केल्याचा आरोप करण्यात आला. या उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे विजय सोनवने यांनी स्पष्ट केले. हा प्रकार विश्वासू सहकारी पक्षाचा उघड विश्वासघात असल्याचा आरोप करत मनपा निवडणुकीसाठी रिपाई (आठवले) व भाजपची युती संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande