वेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती
काराकास, 04 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी यांना ताब्यात घेतल्यानंतर वेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. वेनेझुएला
वेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती


काराकास, 04 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी यांना ताब्यात घेतल्यानंतर वेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. वेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठाने शनिवारी आदेश जारी करत सांगितले की, निकोलस मादुरो यांच्या अनुपस्थितीत डेल्सी रोड्रिग्ज देशाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहतील.

न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रशासकीय सातत्य आणि देशाच्या एकूण संरक्षणासाठी हे पाऊल आवश्यक आहे. तसेच, राज्याची सातत्यता, सरकारचे संचालन आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी या प्रकरणातील कायदेशीर चौकटीवर पुढे चर्चा केली जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले.

वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर रविवारी न्यूयॉर्कला आणण्यात आले. न्यूयॉर्कमधील डीईए (ड्रग एन्फोर्समेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) केंद्रात मादुरो यांच्या हातात बेड्या घातलेल्या अवस्थेतील व्हिडिओ समोर आला आहे. डीईए केंद्रात पोहोचताच मादुरो यांनी तेथील अधिकाऱ्यांना आपल्या पहिल्याच शब्दांत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर मादुरो यांना मॅनहॅटन येथील संघीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था आणि कायदा अंमलबजावणी संस्थांनी संयुक्त कारवाई करत शनिवारी वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना वेनेझुएलाची राजधानी कराकास येथून अटक करून अमेरिकेत आणले.

अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, अंमली पदार्थांच्या तस्करी आणि ‘नार्को दहशतवाद’ रचल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने यापूर्वीच मादुरो यांच्या अटकेसाठी १.५ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande