
नाशिक, 05 जानेवारी (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अधिवेशनाचा सोमवारी समारोप झाला. २ ते ५ जानेवारी दरम्यान नाशिक येथे पार पडलेल्या या अधिवेशनात विविध सत्रे प्रास्ताविके, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक, कुंभमेळा असे ४ प्रस्ताव पारित करण्यात आले.
सकाळी “स्वबोध” या विषयावर रा. स्व. संघाचे जेष्ठ प्रचारक श्री. सुमंत आमशेकर यांनी मार्गदर्शन केले. भारत हा युग परिवर्तन करण्याची क्षमता असणाऱ्या युवकांचा देश आहे. भारताची संस्कृती ही माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या: अशी पर्यावरण पूरक राहिली असून भारत हा युग परिवर्तन करण्याची क्षमता असणाऱ्या युवकांचा देश आहे असे आमशेकर यांनी यावेळी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र प्रातांच्या अधिवेशनाच्या शेवटी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकरणीवर नाशिकचा वरचष्मा पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र उपअध्यक्ष म्हणून प्रा. प्रदिप वाघ, सहमंत्री म्हणून मेघा शिरगावे, आयटी आय प्रमूख प्राचार्य वैभव गुंजाळ, राष्ट्रीय कलामंच प्रमूखपदी पियुषा हिंगमीरे या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV