
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुक प्रभाग क्र. २ या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व महिला बालकल्याण राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली.
सर्व समाज घटकांचा एकसमान विकास, हेच भाजपचे ध्येय असून 'सब का साथ सब का विकास' या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या मूलमंत्रावर पक्ष चालत आहे. आपल्या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. भाजपाला मत म्हणजे शहराच्या आणि आपल्या घरातील प्रत्येकाच्या विकासाला मत, त्यामुळे येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हा संबंधी बटन दाबून भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन करण्यात आले
यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर,आ. अभिमन्यू पवार, माजी आ. गोविंदअण्णा केंद्रे, पाशाजी पटेल, शहर जिल्हाध्यक्ष अजितजी पाटील कव्हेकर, अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्रजी त्रिरुके आदींसह प्रभागातील उमेदवार व मतदार नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis