छ.संभाजीनगर : ‘अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो' या नवव्या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) च्या ''अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो'' या नवव्या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेंद्रा ऑरिक येथे आठ ते अकरा जानेवार
छ.संभाजीनगर : ‘अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो' या नवव्या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी


छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) च्या 'अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो' या नवव्या औद्योगिक प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शेंद्रा ऑरिक येथे आठ ते अकरा जानेवारी दरम्यान भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात स्थानिक, राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील १५०० हून अधिक उद्योगांचा सहभाग असणार आहे.

प्रदर्शनादरम्यान औद्योगिक, व्यावसायिक वृद्धी मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन विविध सत्रातून होणार आहे.मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होणार आहे. मराठवाड्यातील औद्योगिक संधींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे, स्थानिक उद्योजक, महिला उद्योजक व नवउद्योजकांना नवीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे, निर्यातक्षम उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे तसेच मराठवाड्यातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा प्रदर्शनाचा उद्देश आहे.

प्रदर्शनात मशीन टूल्स, ऑटो कंपोनंटंस, ऑटोमेशन, गेजेस, फिक्शचर्स, डाय अँड मोल्ड, मेटल सर्फेस फिनिशर इंडस्ट्रिज, अॅग्रीकल्चर, फूड इंडस्ट्रिज, फायनान्स इंडस्ट्रिज, एनर्जी अँड इलेक्ट्रिकल्स, इन्फोर्मेशन टेक्नॉलीजी, स्टार्टअप्स, बांधकाम आदींसह विविध क्षेत्रांतील उद्योगांचा सहभाग आहे.

या औद्योगिक प्रदर्शनात उद्योग व्यवसायसंबंधीच्या विविध विषयांवर अनुभवी व तज्ज्ञ व्यक्ती व प्रथितयश उद्योजकांचे मार्गदर्शनपर परिसंवाद, चर्चासत्रे होतील. बी टू बी आणि व्हेंडर मीट होतील. प्रदर्शनाचा शहरवासीयांसह मराठवाड्यातील उद्योजक, व्यापारी, विद्यार्थ्यांनी लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande