
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। शिवसेनेची विकासाची परंपरा हीच स्वाभिमानाची भूमिका असल्याचा उल्लेख माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.
प्रभाग क्रमांक 19 चे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार - रणजीत शामराव दाभाडे, स्वाती देविदास रत्नपारखी, सुजाता संतोष गायकवाड, नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन संपन्न झाले.
मादी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की,शिवसेनेची विकासाची परंपरा, स्वाभिमानाची भूमिका आणि लोकहिताची बांधिलकी लक्षात घेऊन मतदारांनी मशाल चिन्हावर एकजुटीने मतदान करा. या चारही अधिकृत उमेदवारांना 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन यावेळी मतदारांना केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis