छ.संभाजीनगर मनपा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्र.२४ मधील अधिकृत उमेदवार (अ) गंगाबाई भिमराव भवरे-कुचे, (ब) सौ.कमल रामचंद्र नरोटे, (क) सौ.मुक्ता किसन ठूबे आणि (ड) सुन
प्रचार कार्यालयाचे उद्घाटन


छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्र.२४ मधील अधिकृत उमेदवार (अ) गंगाबाई भिमराव भवरे-कुचे, (ब) सौ.कमल रामचंद्र नरोटे, (क) सौ.मुक्ता किसन ठूबे आणि (ड) सुनिल देविदास जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांंनी उद्घाटन केले

विकास, पारदर्शकता आणि विश्वासाच्या बळावर प्रभागाच्या प्रगतीसाठी भाजपाच्या उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती यावेळी नागरिकांना करण्यात आली.

यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे , आमदार चव्हाण,खासदार डॉ.भागवत कराड , आमदार श्री.नारायण भाऊ कुचे भाजपा शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande