रायगडमध्ये आत्माराम पाटील यांच्या विकासवारशाचा लाभ; प्रभाग ८ मध्ये रोहन पाटील चर्चेत
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कळंबोलीतील सर्वच प्रभागांत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असली, तरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये मात्र अपक्ष उमेदवार रोहन पाटील यांनी वेगळेच चित्र निर्माण
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कळंबोलीतील सर्वच प्रभागांत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असली, तरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये मात्र अपक्ष उमेदवार रोहन पाटील यांनी वेगळेच चित्र निर्माण केले आहे. समाजसेवक आत्माराम पाटील यांचे चिरंजीव असलेले रोहन पाटील ‘कप-बशी’ या चिन्हावर निवडणूक लढवत असून, मतदारांचा त्यांना वाढता आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.   पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी कळंबोली व परिसराच्या विकासात आत्माराम पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. सलग १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कळंबोली विभागाचा सर्वांगीण विकास साधला. पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेली कामे आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत. हाच विकासाचा आणि सेवेचा वारसा रोहन पाटील पुढे नेत असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.   रोहन पाटील यांनी प्रचारादरम्यान केवळ राजकीय आश्वासनांवर भर न देता प्रत्यक्ष प्रश्नांना हात घातला आहे. अवाजवी मालमत्ता कर, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, रस्ते व स्वच्छता, महिलांची सुरक्षितता तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. “विकास म्हणजे घोषणा नव्हे, तर काम,” हा संदेश त्यांनी प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवला आहे.   प्रभाग क्रमांक ८ मधील अनेक नागरिक रोहन पाटील यांना केवळ उमेदवार न मानता ‘घरातील माणूस’ समजत आहेत. नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून, हा जनाधार प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरत आहे. आत्माराम पाटील यांच्यावरील विश्वास आणि रोहन पाटील यांची तरुणाई, सामाजिक जाण व कामाची पद्धत यामुळे प्रभाग ८ मध्ये त्यांचे पारडे जड मानले जात आहे. आता येत्या निवडणुकीत मतदार राजा कोणाला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कळंबोलीतील सर्वच प्रभागांत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत असली, तरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये मात्र अपक्ष उमेदवार रोहन पाटील यांनी वेगळेच चित्र निर्माण केले आहे. समाजसेवक आत्माराम पाटील यांचे चिरंजीव असलेले रोहन पाटील ‘कप-बशी’ या चिन्हावर निवडणूक लढवत असून, मतदारांचा त्यांना वाढता आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी कळंबोली व परिसराच्या विकासात आत्माराम पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. सलग १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कळंबोली विभागाचा सर्वांगीण विकास साधला. पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेली कामे आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत. हाच विकासाचा आणि सेवेचा वारसा रोहन पाटील पुढे नेत असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.

रोहन पाटील यांनी प्रचारादरम्यान केवळ राजकीय आश्वासनांवर भर न देता प्रत्यक्ष प्रश्नांना हात घातला आहे. अवाजवी मालमत्ता कर, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, रस्ते व स्वच्छता, महिलांची सुरक्षितता तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. “विकास म्हणजे घोषणा नव्हे, तर काम,” हा संदेश त्यांनी प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवला आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधील अनेक नागरिक रोहन पाटील यांना केवळ उमेदवार न मानता ‘घरातील माणूस’ समजत आहेत. नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून, हा जनाधार प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरत आहे. आत्माराम पाटील यांच्यावरील विश्वास आणि रोहन पाटील यांची तरुणाई, सामाजिक जाण व कामाची पद्धत यामुळे प्रभाग ८ मध्ये त्यांचे पारडे जड मानले जात आहे. आता येत्या निवडणुकीत मतदार राजा कोणाला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande