
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। बुलढाणा-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील धाड गावाजवळ जवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला असून अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. तर, स्थानिकांना धाव घेत रुग्णवाहिकेलाही पाचारण केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.
छत्रपती संभाजी नगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला भरधाव दुचाकी धडकली, या दुचाकीवरुन तीन जण प्रवास करत होते. धाड गावाजवळ या दुचाकीने बसला जोराची धडक दिल्याने टु व्हिलरवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले, रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले. मात्र, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तीनही तरुण 20 वर्षे वयाच्या आतीलच असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis