चंद्रपूरात 7 जानेवारीपासून चाचा नेहरू बाल महोत्सव
चंद्रपूर, 05 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, असे बालक व विधी संघर्षग्रस्त
चंद्रपूरात 7 जानेवारीपासून चाचा नेहरू बाल महोत्सव


चंद्रपूर, 05 जानेवारी (हिं.स.)।

चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, असे बालक व विधी संघर्षग्रस्त बालके, बालसंगोपन योजनेचे लाभार्थी तसेच शाळांमध्ये शिकत असलेले सर्वसामान्य बालके यांच्यामध्ये एकमेकांविषयी बंधुभाव निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता 7 ते 9 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदर जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन विनय गौडा यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील 12 शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळ, इंडोर खेळ तथा सांस्कृतिक स्पर्धा, खो-खो, कबड्डी, धावणे, बुद्धिबळ, कॅरम, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, वादविवाद, रांगोळी, नृत्य, गायन, नक्कल आणि एकांकिका आदी स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. बक्षीस 9 जानेवारीला होणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande