
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।
आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच गोपनीय माहिती आधारे अशा फसवणूक करणाऱ्यांची माहिती काढून, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात आर्थिक गुप्त वार्ता पथक (फायनान्सियल इन्टेलिजन्स युनिट) स्थापन करण्यात आले आहे,
सामान्य नागरिकाची आर्थिक फसवणूक होऊ नये. यासाठी दक्षता घेणे. नागरिकांमध्ये प्रत्यक्षात जाऊन,
विविध ठिकाणी भेट देऊन नागरीकांची कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये. यासाठी जागृती करणे, चर्चासत्र आयोजित करून फसवणूक होऊ नये यासाठी जनजागृती करणे, व्याख्यान देणे असे उद्दीष्ट समोर ठेवून त्या धर्तीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार, यांनी पोलिस आयुक्तालय स्तरावर आर्थिक गुन्हे शाखेचे एक पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलिस अंमलदारांचे हे पथक आहे.
उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपुत, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पर्यवेक्षणांतर्गत
पोलिस उपनिरीक्षक सचिन देशमुख व दोन पोलिस अंमलदारांची नियुक्ती या पथकामध्ये करण्यात आली आहे.
शहरात किंवा पोलिस आयुक्तालय परिसरात आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्ती, कंपन्या, बँका, वित्तीय संस्था व इतर मार्गाचा अवलंब करून आर्थिक गुंतवणूकीचे आमिष देणाऱ्या आस्थापनांच्या हालचाली उपनिरीक्षक सचिन देशमुख यांना मोबाइल क्रमांक ९५११६२०६१६ या क्रमांकावर तसेच आर्थिक गुन्हे शाखेचा व्हॉटस क्रमांक ९२२६५१४०१६ वर कळवावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis