
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त सभेत आमदार अमित देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीवर थेट हल्लाबोल केला. लातूर शहरातील झालेल्या ऐतिहासिक सभेत बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, “आमची खरी आणि थेट लढाई ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे. इतर जे काही पक्ष आहेत, ते लिंबू-टिंबू आहेत.”
--------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis