
बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. जयभवानी विद्यालयात ही स्पर्धा झाली. मुलांच्या गटात शारदा विद्या मंदिर विजेता ठरला. मुलींच्या गटात जयभवानी विद्यालयाने बाजी मारली.
शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून महोत्सव आयोजित करण्यात आला. शिवाजीनगर गढी येथील जयभवानी विद्यालयात स्पर्धा झाली.मुलांच्या अंतिम सामन्यात शारदा विद्या मंदिर विजयी झाला. संघातील हिंगे साईराज, हिंगे युवराज, पट्टे अनिरुद्ध, शेजाळ ज्ञानेश्वर यांनी चांगली कामगिरी केली. मुलींच्या गटात जय भवानी विद्यालयाने बाजी मारली. मुलींच्या गटात जयभवानी विद्यालय विजयी ठरले. संघातील किशोरी बारगजे, दुर्गा वाघमारे, अदिती कानडे, संध्या रोमन यांनी चुरशीची खेळी केली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis