
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.) :
श्री रविप्रभा मित्र संस्था, म्हसळा डोळ्यांचे दवाखाना व स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा डोळ्यांचे दवाखाना यांच्या यशस्वी चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे उपस्थित होते.
जाकडे” या ब्रीदवाक्याप्रमाणे संस्थेचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. गरजू रुग्णांना नेत्र तपासणी व शस्त्रक्रियांच्या माध्यमातून दृष्टी देण्याचे मोलाचे कार्य संस्था करत असून ही सेवा अशीच अविरत सुरू राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या औचित्याने गेली ३८ वर्षे निस्वार्थपणे नेत्र चिकित्सक म्हणून सेवा देणारे व नुकतेच सेवावृत्त झालेले डॉ. सलीम धलाईत यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन “सर्वोत्कृष्ट जनसेवक (द बेस्ट पब्लिक सर्व्हंट)” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या शिबिरात शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी नेत्रतज्ज्ञांच्या उपस्थितीत मोफत डोळ्यांची तपासणी करून लाभ घेतला. तसेच श्रीवर्धन आगारातील एस.टी. वाहक व चालक कर्मचाऱ्यांनीही या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. श्वेता अंबाडकर व डॉ. नलिनी जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली.
यावेळी संस्था अध्यक्ष रविंद्र लाड, उपाध्यक्ष नरेश विचारे, पत्रकार उदय कळस, शशिकांत शिर्के, स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाचे कोकण अध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संतोष उद्धरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर लांजेकर, किशोर गुलगुले, संतोष घडशी, सुजित काते, सुशांत लाड, शांताराम निंबरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके