रायगडच्या जे.एस.एम. कॉलेजमध्ये आपदा प्रशिक्षण
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित जनता शिक्षण मंडळ (JSM) महाविद्यालयात ‘युवा आपदा मित्र स्कीम’ (YAMS) अंतर्गत ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत ८ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पचा
पूर, भूकंप, आग नियंत्रणाचे धडे; जे.एस.एम. कॉलेजमध्ये ८ दिवसीय आपदा प्रशिक्षण


रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित जनता शिक्षण मंडळ (JSM) महाविद्यालयात ‘युवा आपदा मित्र स्कीम’ (YAMS) अंतर्गत ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत ८ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पचा मुख्य उद्देश नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीने मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेट्सला सज्ज करणे हा होता.

शिबिराचे नेतृत्व ६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नीतीश पटियाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले. ॲडज्युटंट कॅप्टन मोहसीन खान यांनी कॅम्पचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच कॅडेट्सच्या शिस्तीची जबाबदारी घेतली. या कॅम्पमध्ये एकूण १५० कॅडेट्स (७९ मुली आणि ७१ मुले) सहभागी झाले. सुभेदार मेजर अमरबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सनी विविध कठीण परिस्थितींवर तोंड देण्याचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे DDO सागर पाठक यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन अत्यंत प्रभावी पद्धतीने केले. तसेच, मनोहर म्हात्रे आणि प्रदीप कोंडेकर यांनी कॅडेट्सना पूर, भूकंप, आग व प्राथमिक उपचार यावर सखोल व्यावहारिक प्रशिक्षण दिले.

जनता शिक्षण मंडळचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व असे कॅम्प तरुणांमध्ये समाजसेवा आणि सतर्कतेची भावना निर्माण करतात असे नमूद केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनाली पाटील यांनी कॅम्पसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या व कॅडेट्सचा उत्साह वाढवला. या शिबिरामुळे कॅडेट्सना आपत्ती व्यवस्थापनाच्या तांत्रिक आणि व्यवहारिक पैलूंचे प्रशिक्षण मिळाले असून, भविष्यात ते समाजसेवेत सक्रिय योगदान देण्यास सज्ज होतील. कॅम्पच्या माध्यमातून तरुणांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यास मदत झाली असून, ही शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धत आगामी काळात आणखी प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande