बीड : वडवणीकरांसाठी १२ कोटींचा विकास निधी मंजूर
बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणीकरांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. २०२५-२६च्या जिल्हा वार्षिक योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. वडवणी शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी ३ कोटी, चिंचवण येथील तीन मंदिरांच
बीड : वडवणीकरांसाठी १२ कोटींचा विकास निधी मंजूर


बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणीकरांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. २०२५-२६च्या जिल्हा वार्षिक योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. वडवणी शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी ३ कोटी, चिंचवण येथील तीन मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी ९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

चिंचवणच्या जगदंबा मंदिरासाठी ३ कोटी २८ लाख ८४ हजार, महादेव व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी ५ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. एकूण ८ कोटी ४४ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंदिरांसाठी मंजूर झाला आहे. वडवणी शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

त्याचबरोबर नव्या प्रशासकीय इमारतीच्या अपूर्ण कामासाठी २ कोटींचा निधीही मागितला होता. त्यातील १ कोटी लवकरच मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकांमध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसवण्यासाठीही कोट्यवधींचा निधी लवकरच मिळणार असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आश्वासन दिले आहे. वडवणीच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळत त्यांनी पुन्हा एकदा निधी मंजूर करून दिला आहे.

वडवणी शहर व तालुक्याच्या विकासासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर केला आहे. यामुळे वडवणी तालुक्यातील विकासाला चालना मिळाली आहे. सदरील १२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे. त्याच प्रमणे मंदिरांमध्ये विविध प्रकारची प्रलंबीत कामे पूर्ण केली जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande