एमपीएससी पूर्व परीक्षेला १२१६ उमेदवारांची दांडी
बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा बीड शहरातील १६ केंद्रांवर सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडली. या परीक्षेला एकूण ४ हजार ६५९ उमेदवार बसले होते. त्यापैकी १२१६ जणांनी दांडी मारली, तर ३४
एमपीएससी पूर्व परीक्षेला १२१६ उमेदवारांची दांडी


बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा बीड शहरातील १६ केंद्रांवर सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडली. या परीक्षेला एकूण ४ हजार ६५९ उमेदवार बसले होते. त्यापैकी १२१६ जणांनी दांडी मारली, तर ३४४३ उमेदवार परीक्षेला सामोरे गेले. परीक्षेसाठी उमेदवारांनी सकाळी ९:३० वाजता परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

प्रशासनाकडून परीक्षेच्या व्यवस्थेसाठी १६ उपकेंद्रप्रमुख, ३३ मदतनीस, ७२ पर्यवेक्षक आणि २३० समन्वयक अशा एकूण ३५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्वांना जिल्हा नियोजन सभागृहात विशेष प्रशिक्षणही देण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक उपकेंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला होता. ही परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी नियोजन केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande