हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार मेट्रो
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षितता व तांत्रिक मानकांची पडताळणी करणाऱ्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनची (आरडीएसओ)ची अनिवार्य तपासणी नुकतीच यशस्
Metro Train


पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षितता व तांत्रिक मानकांची पडताळणी करणाऱ्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनची (आरडीएसओ)ची अनिवार्य तपासणी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मेट्रो सुरू करण्यापूर्वीची ही तपासणी महत्त्वाची मानली जाते.माण- हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम अंत‍िम टप्यात आहे.यापूर्वी या मेट्रोची चार स्टेशनपर्यंत चार ते पाच वेळा चाचणी घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या आरडीओच्या तपासणीमुळे ही मेट्रो कार्यान्वित होण्याच्या अंत‍िम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक शहराची मेट्रो वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेली असू शकते. हे नवीन तंत्रज्ञान भारतीय वातावरणात आणि ट्रॅकवर योग्यरित्या काम करेल, याची खात्री करण्याचे काम आरडीएसओ करते.भारतात धावणाऱ्या प्रत्येक मेट्रोची संरचना, डब्यांची रुंदी, ट्रॅकचे मोजमाप आणि वीज पुरवठा यंत्रणा ही सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी आरडीएसओकडे ठराविक मानके असतात. मेट्रो या मानकांवर उतरते की नाही, हे पाहणे आवश्यक असते. मेट्रोमध्ये दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. वळणे, आपत्कालीन ब्रेक यंत्रणा आणि डब्यांची स्थिरता यांची कठोर चाचणी आरडीएसओद्वारे केली जाते. त्यांच्या प्रमाणपत्राशिवाय मेट्रो प्रवाशांसाठी सुरू करता येत नाही. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande