महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला नागपुरात वाढता प्रतिसाद
नागपूर, 5 जानेवारी (हिं.स.) : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करून पर्यावरणपूरक डिजिटल पर्याय स्वीकारण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला नागपूर परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात 10 हजार 588 नवीन वीजग्राहक या य
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला नागपुरात वाढता प्रतिसाद


नागपूर, 5 जानेवारी (हिं.स.) : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करून पर्यावरणपूरक डिजिटल पर्याय स्वीकारण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला नागपूर परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात 10 हजार 588 नवीन वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले असून आतापर्यंत एकूण 32 हजार 853 ग्राहकांनी नोंदणी केली आहे.

या पर्यावरणस्नेही उपक्रमामुळे ग्राहकांना वार्षिक सुमारे 39.42 लाख रुपयांचा फायदा होत आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना ईमेल व एसएमएसद्वारे वीजबिल मिळत असून प्रति बिल 10 रुपयांची सवलत, म्हणजेच वार्षिक 120 रुपयांचा लाभ दिला जात आहे. महावितरणने अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande