
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
लातूरच्या विकासाचा नवा संकल्प: 'राष्ट्रवादी'ला द्या संधी, करून दाखवू पारदर्शक कारभार!
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या विजयाचा संकल्प सिद्धेश्वर चरणी सोडला आहे! राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला.
'विकासाचे व्हिजन'-ना. बाबासाहेब पाटील काय म्हणाले?
आम्हाला कोणावर टीका करायची नाही, तर लातूरचा कायापालट करायचा आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे. आम्हाला सत्ता द्या, आम्ही पारदर्शक प्रशासन आणि गतिमान विकास काय असतो हे दाखवून देऊ!
राष्ट्रवादीचा 'लातूर विकास' अजेंडा:
नियमित पाणीपुरवठा: दर दोन दिवसाला पाणी देण्याचे उद्दिष्ट.
आरोग्य व स्वच्छता: शहराच्या स्वच्छतेवर आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर.
पारदर्शक प्रशासन: भ्रष्टाचाराला थारा नाही, केवळ कामाचा ध्यास.
विकासावर मते: नकारात्मक राजकारण सोडून केवळ कामाच्या जोरावर निवडणूक लढवणार.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती:
यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, शहराध्यक्ष अफसर शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis