पाथरी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आसेफ खान यांनी घेतली विशेष बैठक
परभणी, 05 जानेवारी (हिं.स.)। आसेफ खान यांनी पाथरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच कोणतीही वेळ न दवडता अधिकारी व कर्मचारी यांची निर्णायक बैठक घेतली. मागील काळातील मनमानी कारभार, नियमबाह्य पद्धती आणि दुर्लक्ष यांना पूर्णविराम देत,
Q


परभणी, 05 जानेवारी (हिं.स.)। आसेफ खान यांनी पाथरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच कोणतीही वेळ न दवडता अधिकारी व कर्मचारी यांची निर्णायक बैठक घेतली. मागील काळातील मनमानी कारभार, नियमबाह्य पद्धती आणि दुर्लक्ष यांना पूर्णविराम देत, आता नगरपरिषदेत फक्त आणि फक्त लोकहिताचेच निर्णय घेतले जातील, हे अत्यंत स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले.

सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला आहे की नागरिकांचे काम थांबता कामा नये — काम झालेच पाहिजे!स्वच्छता, पाणीपुरवठा, घरकुल, लाईट, बचत गट यांसह शहरातील प्रत्येक मूलभूत समस्येचे तात्काळ व वेळेत निराकरण करण्याचे ठोस आदेश देण्यात आले. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्वरित कार्यवाहीसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.लोककल्याणाला प्राधान्य पाथरीकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आता आश्वासन नाही, काम बोलणार आहे.

यावेळी जेष्ठ नेते युसोफोद्दीन अन्सारी, अफसर अन्सारी तसेच नगरसेवक अलोक चौधरी, साजेद राज, हासिब खान, उद्धव नाईक, अनिल ढवळे, गोविंद हारकळ, मुजिम आलम, खालेद चाऊस व नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande