गायकवाड, चौगुलेंसह सहाजण कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्काराचे मानकरी
कोल्हापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। कोल्हापूरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूरच्या वतीने सन २०२५ वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.प्रिंट मीडियामध्ये राहुल गायकवाड (टाईम्स ऑफ इंडिया),राजकुमार चौगुले (दैनिक सकाळ
कोल्हापूर प्रेस क्लबच्या  पुरस्काराचे मानकरी


कोल्हापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। कोल्हापूरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूरच्या वतीने सन २०२५ वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.प्रिंट मीडियामध्ये राहुल गायकवाड (टाईम्स ऑफ इंडिया),राजकुमार चौगुले (दैनिक सकाळ ॲग्रोवन), उपसंपादक विभागात विश्वास दिवे (दैनिक तरुण भारत संवाद),छायाचित्रकार पांडुरंग पाटील( दैनिक पुण्यनगरी) यांना तर इलेक्ट्रॉनिक मीडिया विकास पाटील(दूरदर्शन) आणि डिजिटल मीडिया विभागात महेश कांबळे (ई-टीव्ही भारत) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.यावेळी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे परीक्षण जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ,शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर,बी न्युजचे संपादक चारुदत्त जोशी,एस न्यूज चे संपादक कृष्णात जमदाडे तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देसाई यांनी केले.

पुरस्काराचे वितरण लवकरच एका शानदार सोहळ्यात करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी सांगितले.तसेच याच समारंभात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांच्या पत्रकारितेतील पन्नास वर्षाच्या अनुभवावर आधारित घडलय बिघडलय या पुस्तकाचे प्रकाशनही केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande