एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करा; ओवेसींना देशाबाहेर हाकला -  नवनीत राणांचे प्रत्युत्तर
अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) | काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत, जर ते १९ मुले जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुले जन्माला घातली पाहिजेत, असे विधान केले होते. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार
एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करा, ओवेसींना देशाबाहेर हाकला:-  नवनीत राणांचे प्रत्युत्तर


अमरावती, 05 जानेवारी (हिं.स.) | काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत, जर ते १९ मुले जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुले जन्माला घातली पाहिजेत, असे विधान केले होते. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणांवर टीका करताना तुम्ही ४ नाही तर ८ मुले जन्माला घाला, आम्हाला काय देणेघेणे! असा टोला लगावला होता. आता नवनीत राणा यांनी त्यावर प्रत्युत्तर देत ओवेसी यांचे भारतीय नागरिकत्व काढून त्यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, अशी बोचरी टीका केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, असदुद्दिन ओवेसी हे एक ज्येष्ठ संसद सदस्य आहेत. एका लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. ते स्वत:च्या पक्षाचे नाव मोठ्याने घेतात. ते देशाच्या संविधानाबद्दल का बोलत नाहीत, असा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यांना विचारले की तुम्ही देशाच्या संविधानाला पुढे ठेवणार की इस्लामला पुढे ठेवणार, तर ओवेसी म्हणतात आम्ही आमच्या इस्लामला समोर ठेवू. भारत माता की जय म्हणायला यांना लाज वाटते. वंदे मातरम् बोलायला यांना लाज वाटते. संविधानाबद्दल हे काहीच बोलत नाहीत.

नवनीत राणा म्हणाल्या, ओवेसी यांचे भारतीय नागरिकत्व काढून त्यांना या देशातून बाहेर फेकले पाहिजे. मग हे पाकिस्तानमध्ये जाऊन दहा, वीस मुले जन्माला घालतील, यांना कुणीही विचारणार नाही. तेथे असलेल्या दारिद्र्याची त्यांना कल्पना येईल. मी हिंदूंनी चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे वक्तव्य मी केले होते, तर ते उघडपणे स्वत:ची सहा मुले आहेत, असे म्हणतात. ज्या मौलानाने १९ मुले जन्माला घातली आहेत, त्या मौलानाला जाऊन भेटायचे आहे, असे सांगतात. तुमची इच्छा काय आहे, असा सवाल नवनीत राणांनी केला.

नवनीत राणा म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांची संख्या कशी वाढली, हे सांगा.

मुंबईमध्ये यांची संख्या किती वाढली, याचे उत्तर द्या. घुसखोरांमुळे आसाममध्ये यांची दोनशे टक्क्यांनी वाढ झाली, यावर बोला. तेलंगणांमध्ये दुप्पट वाढ झाली, यावर उत्तर द्या. दिल्लीमध्ये किती संख्या वाढली, हे सांगा. एक संसद सदस्य म्हणून संविधानाविषयी त्यांनी बोलले पाहिजे. तुम्ही भारतात राहता, तर तुम्ही भारत माता की जय बोलले पाहिजे. आम्ही दहा मुले जन्माला घालायला तयार आहोत. तुम्ही या भारतमातेचा सन्मान करणे शिकले पाहिजे. त्याचीही तुम्हाला लाज वाटते का असेही नवनीत राणा म्हणाल्यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande