सोलापूरात विकास कामांच्या जोरावर तस्लिम शेख पुन्हा मैदानात
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत भाजपने युती न केल्याने यंदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेची मजबूत युती झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. म्हणून काही बंडखोरी करत अपक्ष म्हणून आव्हान दि
सोलापूरात विकास कामांच्या जोरावर तस्लिम शेख पुन्हा मैदानात


सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत भाजपने युती न केल्याने यंदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेची मजबूत युती झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. म्हणून काही बंडखोरी करत अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. पण प्रभाग वीस मध्ये मागील आठ वर्ष केलेली विकास कामे आणि संपर्काच्या जोरावर माजी नगरसेविका तस्लिम इरफान शेख या पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात उभ्या आहेत. त्यांनी विशेष करून त्या प्रभागात एमआयएम ला आपले आव्हान दिले आहे.

2017 ते 2025 या काळात त्यांनी प्रभागात तब्बल सात कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. विकासकामांच्या जोरावर त्या निवडणूक लढवत असल्याने विरोधी पक्षांचे टेन्शन वाढले असल्याचे चित्र पाहायला मिळते. प्रभागात विकास कामांसोबतच आरोग्य शिबिर, अन्नधान्य वाटप, चष्मे वाटप, साड्या छत्री वाटपासह विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले आहेत. ही त्यांची जमेची बाजू असून या उपक्रमांचे कायमच कौतुक झाले आहे. या जोरावरच तसलीम शेख यांनी विजयाचा दावा केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande