सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळ शिवारात भीषण अपघात
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ जवळ मुंबई वरून सोलापूर कडे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH 46 BU 5408 ने मोडनिंब वरून सिद्धेवाडी कडे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 V 6039 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झा
सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळ शिवारात भीषण अपघात


सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)।

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ जवळ मुंबई वरून सोलापूर कडे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH 46 BU 5408 ने मोडनिंब वरून सिद्धेवाडी कडे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक MH 13 V 6039 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालक डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला, तर कारमधील अन्य 5 जण किरकोळ जखमी झाले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटार सायकल स्वाराला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिके मधून डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वी मृत घोषित केले. कार मधील किरकोळ जखमी झालेल्या 5 जणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर डॉ सरवदे यांनी उपचार करून त्यांना कळंबोली येथे पाठविले.

अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक व मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होऊन अपघातातील कार आणि दुचाकी वरवडे टोल नाका येथील गस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.युवराज बजरंग शिंदे वय 55 वर्षे. रा. सिद्धेवादी ता मोहोळ जि सोलापूर असे मृताचे नाव आहे. तर मच्छिंद्र नागनाथ नागरगोजे रा कळंबोली, सविता वामन खाडे रा कळंबोली, दक्ष बाळू मगर रा पनवेल, निर्मला बाळू भगत रा पनवेल, देवांश बाळू भगत रा पनवेल अशी जखमींची नावे असून, मच्छिंद्र नागनाथ नागरगोजे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीसात झाली असुन तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande