बीड: वडवणी शहरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता
बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। शाकंभरी महोत्सवा निमित्ताने वडवणी शहरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता झाली. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला. या वेळी महाराष्ट्र
कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ


बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। शाकंभरी महोत्सवा निमित्ताने वडवणी शहरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता झाली. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला.

या वेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांनी सत्कार स्वीकार करून आशीर्वाद दिला. गेल्या आठ दिवसांपासून वडवणी शहरात अखंडपणे सुरू असलेला कीर्तन महोत्सव व शिवपुराण कथा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांच्या प्रभावी वाणीने संपूर्ण वडवणी शहर मंत्रमुग्ध झाले व भक्तिरसात न्हाऊन निघाले.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande