कुलगुरू डॉ. इंद्र मणि आणि वर्षा लड्डा यांची संशोधन प्रकल्पाला भेट .
छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिहाखेडी येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. मागील काही महिन्यांपासून भौतिक सोयीसुविधा आणि इतर प्रलंबित प्रस्तावामुळे प्रकल्प रखडला आहे.
कुलगुरू डॉ. इंद्र मणि आणि वर्षा लड्डा यांची संशोधन प्रकल्पाला भेट .


छत्रपती संभाजीनगर, 05 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील

लिहाखेडी येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. मागील काही महिन्यांपासून भौतिक सोयीसुविधा आणि इतर प्रलंबित प्रस्तावामुळे प्रकल्प रखडला आहे. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव मार्गी लावले जातील, असे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालिका वर्षा लड्डा-उंटवाल यांनी स्पष्ट केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लिहाखेडी (ता. सिल्लोड) येथील कृषी महाविद्यालयास आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पास कुलगुरू डॉ. इन्द्र मणी आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालिका वर्षा लड्डा-उंटवाल यांनी भेट दिली. त्यांची कृषी महाविद्यालयातील अधिकारी आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद बैठक पार पडली. प्रक्षेत्रावरील गहू 'फुले समाधान' पैदासकार पिकाची पाहणी करण्यात आली. तसेच जैविक औषधी व जैविक खते संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेस भेट देऊन जैविक उत्पादनांची माहिती घेतली. ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रियेचीही माहिती घेण्यात आली.

संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि परिषदेचे डॉ. शिंदे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान केंद्रप्रमुख डॉ. दीप्ती

पाटगावकर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सादर

प्रस्तावांतील त्रुटींची पूर्तता करून त्यांना लवकर मंजुरी मिळावी, असे कुलगुरु यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे कृषी परिषदेकडे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव शासनाच्या निदर्शनास आणून ते मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. कृषी महाविद्यालय लिहाखेडीच्या प्रस्तावांसाठीही शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असे वर्षा लड्डा यांनी सांगितले. सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी कृषी महाविद्यालयाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. या बैठकीला डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. आशिष बागडे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, दत्ता मुळे, संतोष ढगे, रामेश्वर ठोंबरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande