पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले २१ व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षण केंद्र आहे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून ही संस्था वेगाने पुढे जात आहे असे गौरवोद्गार परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर यांनी
पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले शिक्षण केंद्र – डॉ. विजय भटकर


पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। पीसीयू म्हणजे दूरदृष्टी व जागतिक उद्दिष्टे असलेले २१ व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षण केंद्र आहे, जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून ही संस्था वेगाने पुढे जात आहे असे गौरवोद्गार परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर यांनी पीसीयूच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यात काढले. विद्यापीठाच्या ध्येयधोरणाचे आणि दीर्घकालीन शैक्षणिक दृष्टीचे भटकर यांनी विशेष कौतुक केले. शैक्षणिक विस्ताराच्या योजना तसेच प्रस्तावित केंद्रीय संशोधन सुविधा, संशोधन केंद्र या उपक्रमांचा उल्लेख करत, हे केंद्र विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रासाठी आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि व्यावहारिक समस्यांच्या निराकरणासाठी एक महत्त्वाचे सामायिक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ, पुणे येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ विद्यापीठ कॅम्पसमध्ये संपन्न झाला. पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील म्हणाले, जागतिक दर्जाचे उद्योग - संलग्न विद्यापीठ म्हणून विकसित होण्याचे पीसीयूचे उद्दिष्ट आहे. वेगाने विकसित होणाऱ्या आधुनिक उद्योग व्यवसायासाठी ज्ञान आणि संशोधन वृत्ती असणारे कुशल मनुष्यबळ घडविण्याने काम पीसीयू मधील उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग करीत आहे. शैक्षणिक संस्था आणि उद्योग या दोन्ही घटकांनी एकत्र पद्धतीने काम केल्यास आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर उपाय शोधण्यास मदत होईल. आता आम्ही केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशाच्या विकासात सहभागी होण्यास पूर्ण क्षमतेने सज्ज आहोत असे पाटील यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande