बीड : महिलांना रोजगार; येडेश्वरी फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी
बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। खा. बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी फाउंडेशनमार्फत केज येथे महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. एकल महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमातून शेकडो महिला
बीड : महिलांना रोजगार; येडेश्वरी फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी


बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। खा. बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी फाउंडेशनमार्फत केज येथे महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. एकल महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमातून शेकडो महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना शिवणकाम, अरीवर्क, बेकरी प्रॉडक्ट्स, कॉम्प्युटर कोर्स यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण येडेश्वरी फाउंडेशनच्या कार्यालयात सुरू आहे. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी बचत गट तयार करून व्यवसाय सुरू केले. त्यामुळे अनेक कुटुंबांना थेट फायदा झाला आहे.

गोरगरीब महिलांचे व्यवसाय उभे राहत आहेत. महिलांच्या स्वावलंबनासाठी फाउंडेशनचे प्रयत्न प्रेरणादायी ठरत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लव्हुरी येथे रूपाली शिनगारे यांच्या 'राजवीर एंटरप्राईजेस व जनरल स्टोअर्स' या व्यवसायाचे उदघाटन करण्यात आले. फाउंडेशनच्या शितल लांडगे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले. कार्यक्रमास उपसरपंच विजय चाळक, छत्रभुज चाळक, दीपिका पाटेकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक सरस्वती शिनगारे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश काशिनाथ पाटेकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande