माजलगावमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील फ्लाईंग बर्ड्स अकॅडमी माजलगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. यामध्ये प्राथमिक गटात खोलेश्वर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर माध्यमिक गटात ईगलवूड इंग्लिश स्कूल फुलेपिंपळगावन
माजलगावमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न


बीड, 05 जानेवारी (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील फ्लाईंग बर्ड्स अकॅडमी माजलगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. यामध्ये प्राथमिक गटात खोलेश्वर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर माध्यमिक गटात ईगलवूड इंग्लिश स्कूल फुलेपिंपळगावने प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनाचे उ‌द्घाटन गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मनिष खंडारे होते. या प्रदर्शनात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण, जलसंधारण, हरित ऊर्जा, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानावर आधारित प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांनी प्रकल्पामागील संकल्पना सोप्या भाषेत समजावून

सांगितल्या. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. बक्षीस वितरण समारंभ झाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष मेहरीन शिफा बिलाल चाऊस, रवींद्र महामुनी, लक्ष्मण पोटभरे, गणेश गटकळ, गणेश लाटे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यांनी उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केली. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती वाढीस लागते, असे

मत व्यक्त केले.

प्राथमिक गटात खोलेश्वर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. हजारे विराज भागवत व सृष्टीराज काळे सहभागी झाले. द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय वारोळा यांना मिळाला. टोणपे ओंकार राधाकिसन सहभागी होता. तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पात्रूड यांना मिळाला. शेख हिना कौसर सहभागी झाली. माध्यमिक गटात ईगलवूड इंग्लिश स्कूल फुलेपिंपळगावने प्रथम क्रमांक मिळवला. स्वराज जाधव व पृथ्वीराज शेजूळ सहभागी झाले. द्वितीय क्रमांक मोरेश्वर विद्यालय माजलगाव यांना मिळाला. पवार शुभम व पोपळे लखन सहभागी झाले. तृतीय क्रमांक सिंधफणा पब्लिक स्कूल यांना मिळाला. ओजस कुलकर्णी व श्रीपाद मानधणे सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande