
नांदेड, 06 जानेवारी (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्तिक सभा पार पडली. यावेळी सभेला प्रमुख उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होते.
जनतेला विश्वासात घेऊनच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवत आहोत. खऱ्या अर्थाने दायित्व हे जनतेशीच असून, नागरिकांच्या सूचना, अपेक्षा व सहभागातून नांदेड शहरांचा सर्वांगीण विकास साधत शहरांचा चेहरा-मोहरा बदलण्याचा ठाम विश्वास यावेळी नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis