छ. संभाजीनगर - भाजपा मोठ्या प्रमाणात घवघवीत यश संपादन करेल - रवींद्र चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी पक्ष मोठ्या प्रमाणात घवघवीत यश संपादन करेल, असा ठाम निश्चय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला छत्रपती संभाजीीनगर येथे ते बोलत ह
महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी पक्ष मोठ्या प्रमाणात घवघवीत यश संपादन करेल, असा ठाम निश्चय


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी पक्ष मोठ्या प्रमाणात घवघवीत यश संपादन करेल, असा ठाम निश्चय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला छत्रपती संभाजीीनगर येथे ते बोलत होते

भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुथ प्रमुख, उमेदवार व पक्ष पदाधिकारी यांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुती, बुथस्तरीय नियोजन, प्रचाराची दिशा व समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून प्रत्येक बुथवर भाजप अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री अतुल सावे डक्टर भागवत कराड यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande