बीड-किल्ले धारूर येथील माजी सैनिक भवनासाठी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर
बीड, 06 जानेवारी (हिं.स.)बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील माजी सैनिक भवनासाठी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले कि,माजी सैनिक म्हणजे देशासाठी
किल्ले धारूर येथील माजी सैनिक भवनासाठी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर


बीड, 06 जानेवारी (हिं.स.)बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील माजी सैनिक भवनासाठी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले कि,माजी सैनिक म्हणजे देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे सच्चे देशभक्त. सीमेवर ठामपणे उभे राहून त्यांनी आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळेच आज आपण शांततेत आणि निर्धास्तपणे श्वास घेऊ शकतो. त्यांच्या अतुलनीय त्यागाप्रती, शौर्याप्रती आणि देशभक्तीप्रती आपण सदैव कृतज्ञ आहोत. त्यांच्या शिस्तीला आणि बलिदानाला मनापासून सलाम आपण सर्वजण त्यांच्या ऋणात आहोत. किल्ले धारूर येथे माजी सैनिक असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.

या वेळी असोसिएशनच्या वतीने माजी सैनिकांसाठी स्वतंत्र माजी सैनिक भवन उभारण्यात यावे व त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा सन्मान राखत नगरपरिषदेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली असून, माजी सैनिक भवनासाठी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी घोषणा आमदार सोळंके यांनी केली. लवकरच या कामास प्रशासकीय मान्यता मिळून येत्या एक वर्षाच्या कालावधीत हे भवन उभे राहील, असा विश्वास आहे. यामुळे माजी सैनिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळेल आणि त्यांच्या सन्मानात भर पडेल. असेही

आमदार सोळंके यांनी स्पष्ट केले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande